नाशिक : प्रतिनिधी
साहित्य रंग, साहित्य मंच आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्यामध्ये लेखक व कवी सुहास हरिश्चंद्र टिपरे यांना त्यांच्या सामाजिक व साहित्यिक सेवेचा गौरव म्हणून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
नारायण सुर्वे वाचनालयामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष व साहित्यिक रविकांत शार्दूल, कवी सुभाष उमरकर, प्रमुख पाहुणे हर्षवर्धन जाधव, लेखिका इंदिरा जाधव, युवा लेखिका अश्विनी सांगळे यांच्या उपस्थितीमध्ये हा गौरव झाला. लेखक व वक्ते सुशीलकुमार शिंदे, डॉ. विजय पाटील यांनी आयोजन केले होते.
—