म्हसरूळ, (वा.)
लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळ संचलित दिंडोरी रोडवरील आठवले-जोशी विद्यालयामध्ये 94 वे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक व साहित्यिक जयंत नारळीकर यांच्या जीवनपटाची ओळख विविध उपक्रमांच्या माध्यमातून करून देण्यात आली.
नारळीकर यांच्या जीवनपटाच्या ओळखीच्या अनुषंगाने त्यांच्या विविध चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे असलेले शिवचरित्रकार, लेखक व स्वराज्य परिवाराचे अध्यक्ष भाऊसाहेब नेहरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका दर्शना मोरे, ज्येष्ठ्य शिक्षिका अस्मिता अहिरे, अश्विनी कुलकर्णी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका दर्शना मोरे यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी कुलकर्णी यांनी नारळीकर यांच्या विविध कथा विद्यार्थी व शिक्षकांसमोर मांडल्या.
याप्रसंगी नेहरे यांनी मराठी विश्वकोशात नोंद झालेले `सह्याद्रीचा वाघ-आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे’ या पुस्तकाच्या प्रति भेट दिल्या.
याप्रसंगी जयश्री पवार, शर्मिला डोंगरे, अर्पिता घारपुरे, सीमा कुलकर्णी, मनिषा भोये, स्वाती शेटे, मंजुषा जोशी, शितल शिरसाठ, सोनिया पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
—