नाशिक : प्रतिनिधी
शिक्षकाची मानसिकता व अपेक्षा मी अनुभवली आहे. शिक्षकाने एक पाऊल पुढे राहून, मी स्वतःचे काम उत्तम करून, माझ्या समाजासाठी कार्यतत्पर राहील. माझ्या विकासासाठी सतत प्रयत्न करीन. चांगल्या माणसांचे काम समाजापुढे आणणे आवश्यक आहे. माझी नोकरी, माझा पगार, पदोन्नती या औपचारिकतेच्यापलीकडे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ तथा नाशिक भूषण डॉ. विनायक गोविलकर यांनी केले
शिक्षक गौरव समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आठवले – जोशी बाल विकास मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका दर्शना मोरे यांचा गुणवंत आदर्श मुख्याध्यापक / शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक निवड समिती अध्यक्ष राम महाजन यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विश्वस्त राजेंद्र सराफ यांनी करून दिला. सन्मानपत्राचे वाचन सीमा कुलकर्णी यांनी केले. आभार कोषाध्यक्ष सतीश खोंड यांनी मानले. याप्रसंगी संस्थेतील 10 गुणवंत शिक्षकांचादेखील सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे कार्यवाह सुधीर पाटील यांनी सांगितले की, संस्था शिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. शिक्षकांनी सदैव आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवून प्रयत्न करत रहावे. स्वतःच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नरत राहावे.
संस्थेच्या निवड समितीतंर्गत या पुरस्काराची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जयंतराव कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, अनिल कुरविनकोप, रोहिणी कुलकर्णी, सुहास कुलकर्णी, शशांक इखणकर, सुषमा भानगावकर व संस्था पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्पिता घारपुरे यांनी केले. दर्शना मोरे यांचे बंधू राजेंद्र जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दर्शना मोरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
10 सन्मानार्थी शिक्षक पुढील प्रमाणे
राजेंद्र बडवर, भारती ठाकरे, मनीषा कुलकर्णी, गीता कौटकर, जयश्री पवार, राजेंद्र बिऱ्हाडे, मीनल कांबळे, शर्मिला डोंगरे, अर्पिता घारपुरे, सीमा कुलकर्णी.