नाशिक : प्रतिनिधी
आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने मानवता हेल्थ फाउंडेशन, अभिलाषा निसर्गोपचार केंद्र आणि इंदिरानगर जॉगर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने;- सिटी गार्डन, इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक येथे कार्यक्रम झाला.
आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सकाळी साडेसहा ते साडेसात योगवर्ग नियमित होणार आहेत, यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र दुसाने, साधना दुसाने, अभिलाषा निसर्गोपचार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. तस्मिना शेख आणि इंदिरानगर जॉगिंग क्लबचे अध्यक्ष अवधूत कुलकर्णी, सतीश लोहरकर, संकेत खोडे यांनी केले आहे.
सूर्या फाउंडेशन, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा, आयुष मंत्रालय यांनी योग दिनाचे नियोजन केले. नाशिकच्या श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. तस्मीना शेख यांनी कॉमन योगा प्रोटोकॉलची माहिती साधकांना दिली. ट्रस्टच्या सचिव सुनिता पाटील, योगशिक्षक महासंघाचे अध्यक्ष यू. के. अहिरे, उपाध्यक्ष अशोक पाटील, दीपाली खोडदे, डॉ. विनोद भट, डॉ. अंजली भालेराव, अनुष्का खळदकर, अर्चना दिघे, अपर्णा निकुंभ, वैशाली शिंदे, वैशाली पाटील, जिवराम गावले, अपर्णा निकुंभ, अर्चना शिंदे, कल्पना पवार यांनी प्रात्यक्षिक केली व करून घेतली.
या उपक्रमासाठी सतीश लोहारकर, अरुण मुनशेट्टीवार, सलीम गुलाब इनामदार, जयंत वाळींबे, संकेत खोडे, सुनील खोडे मोटकरी, राकेश खोत, बाळासाहेब दिवे, नीतेश माशी, प्रशांत धुमाळ आदी प्रयत्नशील होते.
—