ज्या विद्यार्थ्यांना अध्यापक म्हणून काम करायचे आहे अशांना एक उत्तम संधी अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे.
– प्रा. शितल आहेर
सहाय्यक प्राध्यापक
अशोका शिक्षणशास्र महाविद्यालय, नाशिक
—
भारतातील शिक्षणक्षेत्रात खूप वाढ होत आहे, म्हणूनच कौशल्यपूर्ण शिक्षकांची मागणी देखील वाढत आहे. अध्यापक होण्यासाठी महाविद्यालयात बारावीनंतर बी. ए. बी.एड व बी. एस्सी. बी एड हा चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम कौशल्यपूर्ण शिक्षक घडविण्यासाठी राबविला जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच बी.एड चे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना एम ए. / एम एस्सी किंवा एम एड करायचे आहे ते करू शकतील. प्रवेश परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. १२ वी पास विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा महाविद्यालयात मोफत उपलब्ध असून इच्छुक विद्यार्थी संपर्क साधू शकतात. बी. ए. बी.एड व बी. एस्सी. बी एड प्रवेशासाठी महा CET देणे अनिवार्य आहे. या चार वर्षाच्या एकात्मिक अभ्यासक्रमाला भोपाळ येथील राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने मान्यता दिली आहे.
एकात्मिक अभ्यासक्रमाची गुणवैशिष्ट्ये
या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्यावर विशेष भर दिला जातो. अध्यापनाच्या विविध पद्धती प्रतिमानांद्वारे शिक्षण उदा. संकल्पना प्राप्ती प्रतिमान, भूमिका पालन प्रतिमान, संगणक आधारित पाठ, प्रकल्प पध्दतीद्वारे शिक्षण सराव पाठ, शैक्षणिक सादरीकरणे, खेळ, चर्चासत्रे, वादविवाद, परिषद या सर्व पैलूंचा यात समावेश केलेला असल्याने हा अभ्यासक्रम शिक्षणशास्राच्या उद्दिष्ट्यांची पूर्तता करतो. छात्रसेवाकाळ उपक्रमास यात विशेष महत्व देण्यात आले आहे. शास्र विद्यार्थी रसायनशास्र, वनस्पतीशास्र जीवशास्र, भौतिकशास्र, संख्याशास्र या विषयात प्रात्यक्षिकाद्वारे प्राविण्य मिळवितात.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कौशल्यपूर्ण शिक्षक तयार करणे हे आज आपल्यापुढे आव्हान आहे. म्हणूनच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार शिक्षक शिक्षण पदवी पात्रता हि चार वर्षाचा एकात्मिक बी. एड. पदवी असावी. विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा विचार करून त्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन एकात्मिक गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम देणे हि काळाची गरज आहे. चांगले कौशल्यपूर्ण शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी घडविणे हि राज्याच्या दृष्टीने या राष्ट्राच्या दृष्टीने जणू एक सुयोग्य गुतंवणूकच ठरणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी खालील नंबरवर संपर्क साधु शकतात किंवा संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. स्मिता बोराडे : ९३५९२९९१२२
डॉ. रेखा पाटील : ९४२३६५६४३६
संकेतस्थळ : https://www.aef.edu.in/ace/
‘अशोका कॉलेज ऑफ एजुकेशन, नाशिक
—