अशोका एकात्मिक बी.एड. महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी

अशोका एज्युकेशन संस्थेच्या अशोका एकात्मिक बी.एड. महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी इंटिग्रेटिव मेडिसिन कन्सल्टंट आणि सीनियर योगा कन्सल्टंट डॉ. मधुर गवळी आणि अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ला आणि  अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांच्या हस्ते करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयात झालेल्या विविध अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.
तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी अदिती सिंग आणि ध्वनी छाबिया यांना आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप अंतर्गत व्हिएतनाम येथे झालेल्या ग्लोबल क्लासरूम मध्ये सहभागी झाल्याबद्दल विशेष सन्मान देण्यात आला. तसेच, तृतीय वर्षाचा विद्यार्थी भावेश बाविस्कर याने अमीटी युनिव्हर्सिटीजयपूरराजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिर आणि अंबिका जथुरे हिची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे झालेल्या आव्हान – आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरामध्ये निवड झाल्याबद्दल गौरविण्यात आले.
सांस्कृतिक आणि क्रीडाप्रधान कार्यक्रमांचे आयोजन
      महाविद्यालयातर्फे सांस्कृतिक आणि क्रीडाप्रधान कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. त्यात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. राजेश्वर जाधव आणि फातेमा रामपुरवाला यांना सांस्कृतिक कार्यक्रमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित केले गेले. तसेच मोहित पाटील आणि आयेशा बेग यांना क्रीडादिनानिमित्त घेतलेल्या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
वार्षिक अहवाल सादर
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालात महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पत्र सादर केले. यामध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उत्कृष्ट संशोधन पेपर पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली. शिक्षकांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यात विविध प्रगती साधण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये प्रकाशित केलेली संशोधन लेखनं आणि इतर शैक्षणिक योगदानांचा उल्लेख करत महाविद्यालयाच्या विकासात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सांगितले.
एकात्मिक जीवनशैली हवी : डाॅ. गवळी
मुख्य अतिथी डॉ. मधुर गवळी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य आणि योगाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, सर्व विद्यार्थ्यांनी सततचा योग्य आहार आणि योगाभ्यास यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी एकात्मिक जीवनशैलीचा अवलंब करावा. करण्याचे सुचवले.

तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी उपयोग व्हावा : शुक्ला
श्रीकांत शुक्ला यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि महाविद्यालयाच्या कार्यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचे आभार मानले. विद्यार्थांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता त्या तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी कसा उपयोग करता येईल याचा विचार करावा. तसेच विद्यार्थांनी सोशल मीडियाला स्वतःवर हावी न होऊ देण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतांना सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांनी यापुढे यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
कार्यक्रमासाठी प्रयत्नशील
कार्यक्रमाचे आयोजन कविता पालवे आणि देवेंद्र अग्निहोत्री यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पंत आणि नैरीन पठाण यांनी केले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक प्रिया कापडणेबी.ए.बी.एड. समन्वयक स्मिता बोराडे, आणि बी.एस.सी.बी.एड. समन्वयक डॉ. रेखा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.