नाशिक : प्रतिनिधी
अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या एआयसीईएसआर (Ashoka Education Foundation’s AICESR) महाविद्यालयाने स्पर्धा परीक्षा कक्ष आणि आयक्यूएसी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर २०२५ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील नेट, सेट कार्यशाळा यशस्वीरीत्या आयोजित केली. ही कार्यशाळा नेट आणि सेट परीक्षांची तयारी करणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांनसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. ज्यात शंभराहून अधिक सहभागींनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यशाळेच्या समारोप सत्रास एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथील शिक्षण विभाग प्रमुख प्रो. डॉ. प्रज्ञा वाकपैंजन यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती दर्शवली. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर अशा महत्त्वाच्या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल एआयसीईएसआर कॉलेजचे विशेष अभिनंदन केले. आपल्या समारोपीय भाषणात डॉ. वाकपैंजन यांनी अशोका नेहमीच विद्यार्थ्यांना शिकण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याने एज्युकेशन फाउंडेशनच्या शिक्षण वातावरणाची प्रशंसा केली आणि अशोका बी.एड. कॉलेजच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल एईएफचे (AEF) अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला आणि प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी एआयसीईएसआर टीम आणि सर्व सहभागींचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सरिता वर्मा यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व तज्ञांचे आणि सहभागींनी दाखवलेल्या सक्रियतेबद्दल त्यांचे आभार मानले. आयक्यूएसी आणि कोर्स समन्वयक डॉ. प्रिती सोनार यांनी कार्यशाळेचा सविस्तर अहवाल सादर केला, तर कार्यशाळेच्या मुख्य समन्वयक समृद्धी चेपे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यशाळेच्या आयोजनासाठी समर्पितपणे काम करत प्रत्येक सत्र प्रभावी आणि लाभदायक बनवले.
—