सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एकात्मिक बी.ए. व बी.एस.सी.बी.एड.परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. नाशिक येथील अशोका एकात्मिक शिक्षणशास्र महाविद्यालयातील बी.ए. व बी.एस.सी.बी.एड. अभ्यासक्रमातील विद्यार्थांनी दरवर्षी प्रमाणे उत्तम यश मिळविले. यात महाविद्यालयाचा निकाल ९६.६० टक्के जाहीर झाला. यात ७३.२३ टक्के विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले.
इलाईट क्लबची स्थापना
महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व विद्यापीठस्तरावर अभ्यासक्रमाचे सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी इलाईट क्लबची स्थापना करण्यात आली. प्रत्येक वर्गातील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश इलाईट क्लब मध्ये केला जातो. यातंर्गत या विद्यार्थ्यांचा संपादणूक स्तर उंचावण्यासाठी विशेष व्याख्याने, माजी विद्यार्थ्यांचे उद्बोधन वर्ग, तसेच सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी मेन्टॉरिंग पद्धतीचा परिणामकारक वापर करण्यात येतो.
`कौशल्ययुक्त शिक्षक व्हा’
महाविद्यालयाच्यावतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहाळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अशोका एज्युकेशन फउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ला यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व इलाईट क्लब बॅच देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी उच्च शिक्षित, गुणवत्तापूर्ण व कौशल्ययुक्त शिक्षक होण्याचे आवाहन केले.
यांनी दिल्या शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, संचालक डॉ. डी. एम. गुजराथी, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रभारी प्राचार्य डॉ. आशा ठोके यांनी स्वागत केले. महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्रा. प्रवीणकुमार जाधव यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी ए.सी.बी.सी.एस. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षा पाटील आणि क्यू.ए.जी. प्रमुख डॉ. परमेश्वर बिरादार उपस्थित होते. प्रा. प्रिया कापडणे व प्रा. योगिता उफाडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. स्मिता बोराडे, डॉ. रेखा पाटील, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
—