नाशिक : प्रतिनिधी
राज्य सामायिक प्रवेश परीक्षेतर्फे (सीईटी सेल) २७ ते २९ मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या बी.एड. सीईटी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी, अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च महाविद्यालयात सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप नीट समजावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने ‘मोफत ऑनलाइन मार्गदर्शन सत्र’ २२ ते २५ मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या सत्रात महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांद्वारे बी.एड. प्रवेश परीक्षेच्या बदलत्या स्वरूपावर आणि महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. परीक्षेला सामोरे जाताना वेळेचे अचूक नियोजन कसे करावे आणि प्रश्नांची काठीण्य पातळी लक्षात घेऊन ते कसे सोडवावेत, याबद्दलची प्रभावी रणनीती या सत्रात शिकवली जाईल. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सरिता वर्मा यांनी केले आहे. हे सत्र ऑनलाइन स्वरूपात असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना घरबसल्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. अधिक माहिती व तांत्रिक मार्गदर्शनासाठी ०२५३-२२३६६०३ किंवा ९८५००६४१६४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. प्रत्यक्ष संपर्कासाठी पत्ता : अशोका बी.एड. कॉलेज, अशोका मार्ग, वडाळा, नाशिक.
—
अशोका महाविद्यालयात बी.एड. सीईटी आणि ईएलसीईटीसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
Get real time updates directly on you device, subscribe now.