नाशिक : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या
बीए – बीएड व बी.एस्सी – बीएड. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत येथील अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील ९९.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ते प्रामुख्याने विशेष प्राविण्य श्रेणी व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
बी.एससी – बीएड. अभ्यासक्रमात रोहन ब्राह्मणे व मदिहा शेख या दोन्ही विद्यार्थ्यांनी ९०.८८ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. इतर असे : द्वितीय – प्रियाकुमारी शर्मा हिने (९०.५०), तृतीय – फिओना डिमेलो (८८.७५), चतुर्थ – नेहा धानदुकीया (८८.५०), पाचवी – विश्वेश्वरी भोयर (८६.८८).
तसेच बीए – बीएड. अभ्यासक्रमात अर्चना पंत हिने (८७.२६) प्रथम क्रमांक प्राप्त केला. इतर असे : द्वितीय – ग्लोरिया मोसेस (८६.५०), तृतीय – आयेशा बेग (८६.२३), चतुर्थ – शाहिस्ता परवीन (८४.८४), पाचवी – सकीना सुबा (८३.५९).
अशोका एज्युकेशन फॉउंडेशनचे अध्यक्ष अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके व महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्रवीणकुमार जाधव, अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. रेखा पाटील व स्मिता बोराडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच प्राची चव्हाण, स्मिता कुलकर्णी व लक्ष्मण राजपूत यांनी परीक्षेचे कामकाज बघितले.
—