नाशिक : प्रतिनिधी
अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या बीए – बी.एड. च्या दोन विद्यार्थिनींनी त्यांचा शैक्षणिक प्रकल्प तुर्कस्तानमध्ये नुकताच पूर्ण केला आहे. तृतीय वर्षात शिकणाऱ्या ध्वनी मोहन छाबिया आणि अदिती शैलेंद्र सिंग तुर्कीमध्ये ४५ दिवसांचा शैक्षणिक प्रकल्प ग्लोबल क्लासरूम हा पूर्ण करून भारतात परतल्या आहेत.
अशोका एज्युकेशन फाउंडेशन आणि आयझाक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यातंर्गत अशोकाचे विद्यार्थी विविध विषयांवर विविध देशांमध्ये त्यांचे शैक्षणिक प्रकल्प पूर्ण करू शकतात. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी परदेशात त्यांचा शैक्षणिक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केली आहे. याच शैक्षणिक संधीचा फायदा घेत हे विद्यार्थी तुर्कस्तानला गेले. त्यांनी विविध अध्यापन पद्धती, शिकण्याच्या पद्धती आणि मूल्यमापन तंत्र इत्यादींबद्दल जाणून घेतले आणि त्यांना भारतीय अध्यापन पद्धतींची ओळख करून दिली. आत्ताच या सर्व गोष्टींची माहिती घेऊन ते भारतात परतले.
अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे आणि अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके यांनी विद्याथिनिंचे कौतुक केले. आयझाकच्या समन्वयक प्रा. प्रिया कापडणे आणि आयझाक टीम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
—
अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या बीए – बी.एड. च्या दोन विद्यार्थिनींचा शैक्षणिक प्रकल्प तुर्कस्तानमध्ये पूर्ण
Get real time updates directly on you device, subscribe now.