नाशिक : प्रतिनिधी
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने
केन केंद्रे कॉलेज येथे आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सवात अशोका सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च कॉलेजने उपविजेतेपद मिळविले.
येथील केन केंद्रे कॉलेज येथे हा महोत्सव झाला. विद्यार्थ्यांनी विविध विभागांत १५ पारितोषिके जिंकली.
या यशाबद्दल अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, एईएफचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, प्रभारी प्राचार्य डॉ. सरिता वर्मा, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सविता शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.
—