नाशिक : प्रतिनिधी
अशोका बी.एड. महाविद्यालयातर्फे वार्षिक क्रीडा महोत्सव वडाळा कॅम्पस येथील मैदानावर उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आनंद विश्वकर्मा (फिजिकल डायरेक्टर, एचपीटी आर्ट्स ॲण्ड आरवायके सायन्स कॉलेज) यांच्या हस्ते झाली.
ते म्हणाले की, खेळ हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक हे चारही पैलू पूर्ण करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत करतात. या माध्यमातून केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर निर्णयक्षमता, संयम आणि खिलाडूवृत्ती यांसारख्या मानवी मूल्यांचीही जोपासना होते. त्यानंतर शपथविधी सोहळा झाला. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये निष्पक्षता आणि सचोटी जपण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रथम वर्षाची विद्यार्थिनी समृद्धी कुलकर्णी आणि आश्मा सिंगने मुख्य अतिथींचे स्वागत व परिचय करून दिला. पायल काळे हिने आभार मानले.
प्रत्यक्ष खेळांना सुरुवात होण्यापूर्वी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी वॉर्म-अप’ सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचा सर्वांनी आनंद लुटला. धावणे, बुद्धिबळ, कॅरम, क्रिकेट यांसारख्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी चुरशीने सहभाग घेतला.
अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी क्रीडा महोत्सवच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक, मार्गदर्शक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्यां डॉ. सरिता वर्मा यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व आणि शिस्तीवर भर दिला. डॉ. सुदर्शन नागरे (शारीरिक शिक्षण संचालक,) यांनी सर्व स्पर्धांचे मार्गदर्शन केले.
या क्रीडा महोत्सवाचे नियोजन नरेश पी. सावंत यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोर्स समन्वयक डॉ. प्रीती सोनार, डॉ. आशिष एस. गुरव, डॉ. मोनाली काकडे, समृद्धी चेपे, सविता शिंदे,भारती मलिक, ग्रंथपाल स्वप्नाली कासार, गणेश पारवे, नम्रता जोशी, यांचे सहकार्य लाभले.
—