नाशिक : प्रतिनिधी
इंजिनीयर जिमवाला या जिम संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे, रील स्टार आकाश नागरे, नृत्यकार सानिका बागूल, डॉ. गौरव कढरे, शरीरसौष्ठवपटू शान मन्सुरी, स्वराज्य परिवाराच्या महिला प्रमुख रेखा नेहरे, जिमचे संचालक व राष्ट्रीय खेळाडू रोहित विसे यांच्या हस्ते करण्यात आले.
सानिका बागूल यांनी लावणी नृत्य आविष्कार दाखविला. डॉ. गौरव कढरे, रेखा नेहरे यांनीही मार्गदर्शन केले. शाम मन्सूर यांनी शरीरसौष्ठवाची प्रात्यक्षिके करून दाखविली. आंतरराष्ट्रीय खेळाडू व जिमचे संचालक रोहित विसे यांनी सूत्रसंचालन केले. जिमच्या प्रशिक्षक व संचालिका साक्षी विसे यांनी आभार मानले. याप्रसंगी असंख्य युवक उपस्थित होते.
—