नाशिकमधील बालचित्रकार मयुरेश आढाव याच्या चित्रांचे चित्रप्रदर्शन१४ ते १६ ऑगस्ट दरम्यान भरणार

0

नाशिक : प्रतिनिधी
ऋतुरंग फाउंडेशनतर्फे बालचित्ररंग हे बालचित्रकार मयुरेशच्या चित्रांचे चित्रप्रदर्शन१४ ते १६ ऑगस्ट दरम्यान भरणार आहे. रोज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत ऋतुरंग भवन, दत्त मंदिर, नाशिकरोड येथे प्रदर्शन असेल.
टिबरेवाला शाळेत इयत्ता सातवीत शिकणारा मयुरेश आढाव या बालचित्रकाराचे हे प्रदर्शन आहे. त्याने अनेक स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविलेले आहेत. अनेक चित्रकारांच्या म्हणण्यानुसार  हा कलाकार चित्रकलेची दैवी देणगी घेऊन आलेला आहे. मयुरेशने आपल्या कलेमाध्यमातुन जगभरातील कलारसिकांची मने जिंकली असून जगभरात प्रसिद्धी मिळवलेली आहे.
सोमवारी (दि.१४) दुपारी चार वाजता सदर चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जागतिक कीर्तीचे चित्रकार राजेश सावंत यांच्या हस्ते होणार आहे. ते उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.
मयुरेशसारख्या शालेय विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे नाशिकरोड भागातील सांस्कृतिक क्षेत्रात नवीन संकल्पना मांडणे हा ऋतुरंग परिवाराचा प्रयत्न असणार आहे. नाशिक तसेच नाशिकरोड परिसरातील विद्यार्थ्यांनी आणि रसिकांनी या आगळ्यावेगळ्या चित्र प्रदर्शनाला व बालकलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.