नाशिक : प्रतिनिधी
दिंडोरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या
सरचिटणीसपदी अमोल गौतमराव खोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, उपजिल्हाप्रमुख अजय दराडे यांनी त्यांची निवड केली. त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. तेव्हा पंढरीनाथ पिंगळे, नीलेश खोडे, सागर वाघ उपस्थित होते. ते जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानचे दिंडोरी तालुका माजी अध्यक्षही आहेत. त्यांच्या निवडीचे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
—
भारतीय जनता पक्ष दिंडोरी तालुका सरचिटणीसपदी अमोल खोडे नियुक्त
Get real time updates directly on you device, subscribe now.
Prev Post