नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये सृजनात्मक चित्रकला खेळाने विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती खुलवली. या उपक्रमासाठी शिक्षकांनी विविध रंग, ब्रशेस आणि एक मोठा पारदर्शक शीट तयार केली होता. रंग भरण्यासाठी आकर्षक ड्रॉइंग टेम्प्लेट्स बनवून त्या पारदर्शक शीटवर लावण्यात आल्या होत्या.
छोट्या अॅप्रन घालून, उत्साहात न्हालेल्या मुलांनी वेगवेगळ्या रंगांच्या छटांनी त्या टेम्प्लेट्स रंगवायला सुरुवात केली. कुणी फुलांना रंग दिला, कुणी आकारांवर काम केलं तर कुणी वेगवेगळ्या वस्तूंना रंगवून आपल्या कल्पकतेची झलक दाखवली. रंगांची मिसळ करून त्यांनी नवीन छटा तयार केल्या आणि या संपूर्ण क्रियाकलापाचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे वर्ग खोली रंगीबेरंगी आणि आनंददायी वातावरणाने भरून गेली.
शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले. रंगांची नावे शिकवली आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलाकृतीचं कौतुक केलं. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आपली सुंदर चित्रं शिक्षक व मित्रांना अभिमानाने दाखवली. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. युडब्ल्यूसीईसीने मुलांना शिकण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची आणि कलेचा आनंद घेण्याची एक मजेशीर संधी दिली.
—