निवेदन देताना डाॅ. सचिन देवरे व सहकारी डॉक्टर्स.
नाशिक, (वा.) सर्व डॉक्टर्स विशेषतः महिला डॉक्टरांना संरक्षण व डॉ. सुवर्णा वाजे मृत्युप्रकरणी सखोल चौकशी करुन लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा द्यावी, याविषयी मागणीचे निवेदन पोलिस खात्याला देण्यात आले. पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देवरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व डॉक्टर्स संघटनांचे पदाधिकारी यांनी हे निवेदन नाशिक जिल्हा ग्रामीण क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिले.
तसेच महिला डॉक्टर प्रतिनिधींनी यावेळी आपल्या भावना बोलून दाखवल्या. नाशिक शहरातील सर्व वैद्यकीय संघटना आयएमए, पीएमए, एमपीए, एफपीए, निमा, न्यू निमा, होमीओपॅथी व इतर यांनी हेमंत पाटील आणि सर्व नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या कार्याचे कौतुक केले व हेही काम ते येत्या एक-दोन दिवसात दक्षपणे तडीस नेतील असा विश्वासही व्यक्त केला.
—