मखमलाबाद विद्यालयात हिवाळी शिबीरास सुरुवात

0

नाशिक : प्रतिनिधी

मविप्र समाज संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मखमलाबाद येथे हिवाळी क्रीडा शिबीरास उत्साहात सुरुवात झाली. प्राचार्य एल. डी. आवारे यांच्या हस्ते या शिबीराचे उद् घाटन करण्यात आले.

याप्रसंगी आवारे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे व त्यातून होणार्‍या व्यायामाचे महत्व समजावून सांगितले. हिवाळ्यातील व्यायाम हा आपल्या शरीरासाठी महत्वाचा असतो. आपले शरीर त्यामुळे नक्कीच तंदुरुस्त राहते. तंदुरुस्त शरीर व खेळाचा सराव असेल तर आपण कुठल्याही खेळात नक्कीच यश संपादन करु शकतो, असेही त्यांनी सांगितले.

विद्यालयाच्या क्रीडांगणावर विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार असून यामध्ये विद्यार्थ्यांना मैदानी प्रकार, हाॅकी, खो-खो, कबड्डी, हँडबाॅल, फुटबाॅल, हाॅलीबाॅल, बॅडमिंटन, योगा, वैयक्तिक खेळ आदी खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या शिबीरासाठी इयत्ता ५ वी ते १० वीच्या २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहेत. शिबीरात क्रीडाशिक्षक ए. पी. पगार, डी. एन. सोनवणे, एन. एस. जाधव हे मार्गदर्शन करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.