म्हसरूळ, (वा.)
येथील प्रभाग 1 मध्ये राहणाऱ्या गुणवंत विद्यार्थीनीला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोन भेट देण्यात आला. त्यामुळे तिच्या शिक्षणाचा मार्ग सुलभ होणार आहे. यासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर पेलमहाले दाम्पत्याने पुढाकार घेतला. या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील अरुण पारधी व अर्चना पारधी या मोलमजुरी करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी सलोनी ही गुणवंत विद्यार्थ्यीनी आहे. तिला शिक्षणाची आवड असून इंग्रजी हा तिचा आवडीचा विषय आहे. चांगले शिक्षण घेऊन पीएसआय होण्याचे स्वप्न ती मनाशी बाळगून आहे. तिच्या या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश पेलमहाले व त्यांच्या पत्नी वंदना पेलमहाले यांनी तिला एक मोबाईल भेट दिला. त्यामुळे ऑलिम्पियाड असो किंवा इतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सलोनीला मदत होईल व प्रोत्साहन मिळेल. ज्येष्ठ्य नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ही भेट पेलमहाले दाम्पत्याने दिली आहे.
—