महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर केवळ २८.४४ एकर जमीन असून अधिक जमीन असल्याचा दावा खोटा : दिनेश पगारे

0

नाशिक : प्रतिनिधी
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर ११०० एकर जमीन असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मात्र, मंत्री बावनकुळे यांच्या नावावर केवळ २८.४४ एकर जमीन असून अधिक जमीन असल्याचा दावा खोटा असल्याचे भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस तथा महामंत्री दिनेश पगारे यांनी सांगितले.

नाशिक दौऱ्यानिमित्त पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली. शेतकरी, मजूर, कष्टकरी व आदिवासी बांधवांना न्याय देण्याचे काम बावनकुळे करत असल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून कुटिल कारस्थान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा  पगारे यांनी दिला.
दरम्यान, बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर कामठी येथेच केवळ २८.४४ एकर जमीन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणीही पगारे यांनी केली.

तसेच विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम होत आहे, हे विरोधकांना पटत नाही. त्यामुळे जबाबदार मंत्र्यांवर ते आरोप करण्याचे षडयंत्र असल्याचे दिसते, असे ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.