नाशिक : प्रतिनिधी
साहित्यरत्न साहित्यमंच आयोजित स्वर्गीय हरिश्चंद्र त्रंबकराव टिपरे हिवाळी साहित्य मैफिल २०२५ उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या पूजा पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सुहास टिपरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गझलकार बाळासाहेब गिरी यांनी केले. विशेष निमंत्रित म्हणून सेवानिवृत्त वायुसैनिक नामदेव हुले उपस्थित होते. ४० कवींनी आपल्या रचना सादर केल्या.
यात गायन, प्रश्नमंजुषा व काव्यवाचन स्पर्धा झाल्या. याचे परीक्षण व्याख्याते व कायदेअभ्यासक सुशील शिंदे यांनी केले. अश्विनी सांगळे यांनी निवेदन केले. आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहा व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनेकांनी गरीब मुलांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत केली.
विविध स्पर्धांचा निकाल असा :
काव्यवाचन स्पर्धा (लहान गट) – प्रथम : श्रावणी खातळे, द्वितीय : सम्राज्ञी सूर्यवंशी. काव्यवाचन स्पर्धा (मोठा गट) – प्रथम : कावेरी मदने, द्वितीय : अर्चना परदेशी, तृतीय : माणिकराव गोडसे, चतुर्थ (विभागून) : सह्याद्री नाटे, प्रशांत दामले, पाचवा क्रमांक : प्रतीक्षा अहिरे.
प्रश्नमंजुषा स्पर्धा – महिला विभाग : प्रतीक्षा अहिरे. पुरुष विभाग : विनोद बैरागी. गायन स्पर्धा – प्रथम : अर्चना परदेशी, द्वितीय : सम्राज्ञी सूर्यवंशी, तृतीय : गायत्री गवारे, चतुर्थ क्रमांक विभागून : प्रमोद पुंडे, अपूर्वा कापडणीस.
—
—