नाशिक | प्रतिनिधी
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर येथे ५३ वे नाशिक शहर मनपास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नाशिक मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी, मविप्र समाज संस्थेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दौलत जाधव, नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनित पवार, वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिरच्या मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे, न्यू मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, शहर विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष शैलेंद्र घुगे, उपाध्यक्ष धनंजय देवरे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल माळी उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी जाधव यांनी विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष पवार यांनी विज्ञान प्रदर्शनासाठी आवश्यक मार्गदर्शक नियम, त्याचप्रमाणे आयोजन हेतू, उपयोग यांची माहिती दिली. त्याचप्रमाणे विज्ञान प्रदर्शन सहभाग वाढवावा व विज्ञानाचे विविध उपक्रमात सक्रिय सहभागी होण्यासाठी आवाहन केले. प्रसंगी सांगितले, सदर विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी गटात ९३ प्रतिकृती, माध्यमिक विद्यार्थी गटात ५० प्रतिकृती, दिव्यांग प्राथमिक माध्यमिक, शिक्षक प्रतिकृती प्राथमिक माध्यमिक,परिचय असे एकूण जवळपास १७८ प्रतिकृती सहभागी झाले आहेत. शैलेंद्र घुगे यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षिका कांचन माळोदे यांनी सूत्रसंचालन केले.
—