नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये स्वातंत्र्यसैनिक क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रम झाला.
क्रांतिवीर नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांनी क्रांतिवीर नाईक यांचे स्वातंत्र्यकाळातील योगदानावर प्रकाश टाकत त्यांचा त्याग व शौर्य आणि देशभक्तीचे आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

याप्रसंगी आयटीआयचे गटनिदेशक उमेश पालवे, निदेशक दीपक साळवे, आनंद जाधव, मधुकर सानप, महेश बोडके, गोकुळ बेदाडे, योगेश गांगोडे, भारती नागरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
—