नाशिक : प्रतिनिधी
नाशिक सार्वजनिक वाचनालयाला ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांनी २० ग्रंथ भेट म्हणून दिले आहेत. सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर व नाट्यगृह सचिव जयेश बर्वे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व म्हटले की, या ग्रंथ भेटीमुळे वाचनालयाच्या विकासाला चालना मिळेल व जास्तीत जास्त वाचकांना ज्ञानर्जन करण्याची संधी मिळेल. समाजाच्या प्रगतीमध्ये वाचनालय महत्वाची भूमिका बजावते व आपल्या सारख्या दानशूर व्यक्तीमुळे हे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडता येते. यावेळी पुस्तक मंडळ प्रमुख मंगेश मालपाठक उपस्थित होते.
टिपरे यांच्या या उपक्रमाबद्दल मान्यवरांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. या आधी १२ सप्टेंबर २०२५ ला टिपरे यांनी १४ ग्रंथ सार्वजनिक वाचनालयाला भेट म्हणून दिले आहेत व मागील वर्षी २५ ग्रंथ सार्वजनिक वाचनालयाला भेट दिले आहेत. सप्टेंबर २५ मध्येसुद्धा सिडकोमधील सुर्वे वाचनालयाला ग्रंथ भेट देऊन वाचन चळवळ कशी वाढवता येईल, मोबाईलचा वापर कमी करून वाचनासाठी मुलांनी कसा प्रयत्न करावा, वाचन कसे करावे यासाठी सिडकोच्या मदर तेरेसा स्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल, शिवाजी चौक व ग्लोबल स्कूल अश्विनीनगर येथे जाऊन विद्यार्थांना पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त केले आहे. मदर तेरेसा स्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या उपक्रमामधून प्रेरणा घेऊन पुस्तक वाचन सुरु केल्याने शाळेने ज्ञानदर्पण २५ पुरस्कार देऊन टिपरे यांच्या उपक्रमाचा सन्मान केला आहे.
—