अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अशोकोत्सव – २०२५ उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी
अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये अशोकोत्सव २०२५ हीआंतरमहाविद्यालयीन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेसाठी विकसित भारतामध्ये तरुणांची भूमिका ही संकल्पना होती. ११ वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणे व त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतु होता.
प्रथम दिवशी पोस्टर, वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली. गायन आणि सामुहिक नृत्य स्पर्धा झाली. नंतर बक्षीस वितरण झाले. स्पर्धेत नाशिकमधील विविध महाविद्यालयातील १५० पेक्षा जास्त मुलांनी सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे अभिनेते व दिग्दर्शक डॉ. राजेश आहेर, तसेच अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके, स्पर्धेचे आयोजक डॉ. स्मिता बोराडे आणि आयक्युएससीच्या समन्वयक प्रा. प्रिया कापडणे, विद्यार्थी प्रतिनिधी अदिती सिंग उपस्थित होते.
डॉ. राजेश आहेर म्हणाले की, विद्यार्थांनी लवकरात लवकर आपल्यातील कौशल्य ओळखावे आणि त्यामध्ये करिअर घडवावे. पण करिअर घडवताना आपण शिक्षणालाही तेवढेच महत्व दिले पाहिजे.
प्रथम दिवशी झालेल्या पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक तेजल दुसाने (केएसकेडब्लू कॉलेज), द्वितीय पारितोषिक स्वरदा कुसमोडे (एलव्हीएच पंचवटी कॉलेज) हिने पटकावले. या स्पर्धेसाठी गार्गी नाटू या परीक्षक होत्या. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक अवनी पवार (एचपीटी आर्ट्स ॲण्ड आरवायके सायन्स कॉलेज) व द्वितीय पारितोषिक आर्या काजल हिने (बीवायके कॉलेज) पटकावले. यासाठी डॉ. तुषार पाटील हे परीक्षक म्हणून होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम पारितोषिक स्पर्श बागुल (बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्स) आणि द्वितीय पारितोषिक राधा देशमुख (बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्स) हिने पटकावले.

गायन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक स्मिता गांगुर्डे (एचपीटी आर्ट्स ॲण्ड आरवायके सायन्स कॉलेज) आणि द्वितीय पारितोषिक हर्षिता बाद्दर (एचपीटी आर्ट्स ॲण्ड आरवायके सायन्स कॉलेज) यांनी पटकावले. रसिका नाटु आणि सॅमसन गायकवाड हे परीक्षक होते. सामूहिक नृत्य सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक बीवायके कॉलेज आणि द्वितीय पारितोषिक (एचपीटी आर्ट्स ॲण्ड आरवायके सायन्स कॉलेज) या संघाने पटकावला. या स्पर्धेसाठी सागर बागूल हे परीक्षक होते.
कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्कॉर्डन्ट लीडर सुप्रिया चित्रे लाभल्या होत्या. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधला व त्या म्हणाल्या की, मुलांमध्ये शिस्तीचे सातत्य असणे महत्वाचे आहे. तसेच मुलांमध्ये धैर्य असणेही खूप महत्वाचे आहे. जर, सातत्य व धैर्य सोबत असेल तर आपण कोणतेही यश गाठू शकतो. त्या पुढे म्हणाल्या की, मुलांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेणे हे खूप महत्वाचे आहे. यश किंवा अपयश यांच्यापलीकडे जाऊन अनुभव तर प्राप्त होतो यावर भर दिला.
संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे म्हणाले की, आजकाल विद्यार्थी हे खूप जास्त प्रमाणात स्क्रीनवर वेळ घालवतात आणि सोशल मीडियाचा खूप वापर करतात. त्यापेक्षा विद्यार्थांनी त्या वेळेचा सदुपयोग करावा. पुढे ते म्हणाले की, विद्यार्थांनी नेहमी काहीतरी शिकत राहिले पाहिजे. ज्याचा उपयोग त्यांना स्वतःचे ज्ञान अद्यावत करता येईल. 
सुप्रिया चित्रे आणि अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धांमध्ये जास्त विजेतेपद पटकावणाऱ्या बीवायके कॉलेज यांनी फिरता अशोकोत्सव चषक पटकावला. प्रा. शीतल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ओरा फाइन ज्वेलरी, आनंद पॅकेजिंग आणि प्रिंटिंग, शहनाई गारमेंट्स, शिवपुरी मिर्झापूर रोड लाईन्स, रोमारो लगेज आणि एम.एम.प्लायवुड हे सदर स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून लाभले होते व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेसाठी अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे आणि अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच सदर स्पर्धेचे आयोजन हे बीए – बीएडच्या समन्वयक डॉ. स्मिता बोराडे, आयक्युएससीच्या समन्वयक प्रा. प्रिया कापडणे यांनी केले. बी. एस्सी – बीएडच्या समन्वयक डॉ. रेखा पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी अदिती सिंग, सर्व विद्यार्थी परिषद प्रतिनिधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाला विविध कॉलेजचे प्राचार्य, शिक्षकवर्ग, तसेच पालक, विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.