नाशिक : प्रतिनिधी
वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. योगेश जोशी लिखित ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला. या पुस्तकाचे प्रकाशन बल्लाळ पब्लिकेशन व अक्षरमंच पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भाजप सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष अविनाश बल्लाळ यांच्या आयोजनाखाली झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून अर्थतज्ज्ञ व लेखक प्रा. डॉ. विनायक गोविलकर होते. अध्यक्षस्थानी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार होते. सुहास टिपरे यांनी सूत्रसंचालन केले. सेजल राणे यांनी वंदे मातरम् गायले. याप्रसंगी भाजपचे शहर सरचिटणीस श्याम बडोदे, सोनाली कुलकर्णी, देवानंद बिरारी, माजी नगरसेवक सुनील खोडे, सुधाकर गायधनी, डाॅ. केंगे, विराज लोमटे, आशा बल्लाळ, अंजली नारायण, रवी पाटील, अतुल देशपांडे, सिद्धेश सोमवंशी, नीलेश अभ्यंकर, तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा भुरे यांनी आभार मानले.
—
डॉ. योगेश जोशी लिखित ‘वंद्य वंदे मातरम्’ पुस्तकाचे प्रकाशन
Get real time updates directly on you device, subscribe now.