मोफत महाआरोग्य शिबिर उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा नाशिक जिल्हा युवक आघाडी व एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरतर्फ मोफत महाआरोग्य शिबिर झाले. युवतींसाठी मोफत एचपीव्ही वॅक्सिंग व महिलांसाठी मोफत तपासणी करण्यात आली. ६०० हून अधिक युवती व महिलांनी यात भाग घेतला. नाशिक शहरात वीरशैव समाजाच्यावतीने सर्व बंधू समभाव या महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीवर आधारित समाजसेवेचा हा उपक्रम होता.

एस.जी. मानवता कॅन्सर सेंटर आणि मानवता हेल्थ कॅम्पस, मायलन सर्कलजवळ हे शिबीर झाले. यात ९ ते ४५ वयोगटातील महिलांसाठी सीएसआर फंडच्या माध्यमातून तब्बल चार हजार रुपये किमतीची कॅन्सर प्री-वेटिंग वॅक्सिंग आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली.

यांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी रसायन व खते राज्यमंत्री भगवंत खुबा होते. माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास मार्गदर्शन मानवता कॅन्सर सेंटरचे डॉ. राज नगरकर, महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा नाशिक जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष अजिंक्य हिंगमिरे यांनी केले. उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा  हिरे, महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा प्रदेशाध्यक्ष प्रा. रमेश आवटे, माजी प्रदेशाध्यक्ष दादासाहेब नगरकर, मा. नगरसेवक भाजपा सरचिटणीस ॲड. शाम बडोदे, सरचिटणीस बाळासाहेब होनराव, तसेच उद्योगपती मल्लिकार्जुन उमदी, उद्योगपती सुनील लोहारकर, प्रदेश उपाध्यक्ष जगदीश घोडके, प्रदेश संघटक अंबादास आंधळकर, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख अविनाश भुसारे, अनिल पठाडे, जिल्हाध्यक्ष नाशिक, डॉ. संदेश हिंगमिरे जिल्हा कार्याध्यक्ष नाशिक, महेश डबे जिल्हा सरचिटणीस नाशिक, सुचित गोंधळे जिल्हा कोषाध्यक्ष नाशिक, संध्या निळकंठ महिला जिल्हाध्यक्ष, भारती बिडवई महिला आघाडी प्रमुख नाशिक शहर, कर्मचारी आघाडी प्रमुख रवी लोहारकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी प्रयत्नशील
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ललित कोरे, श्री सिद्धेश्वर स्वामी, सचिन धोंडगे, राजेश डबे, संकेत राजूरकर, जयवंत टक्के, उमेश गर्जे, कैलास कोठुळे, शैला तोडकर, लतिका साखरे, स्वाती अष्टीकर, वर्षा लिंगायत, कार्तिकी हिंगमिरे, डॉ. वैष्णवी लिंगायत, डॉ.अंकिता हिंगमिरे, निशा गोंधळे, आशिष चांडक, महेश गाडेकर, जीवन लोहारकर यांनी परिश्रम घेतले.
याच कार्यक्रमात युवक अध्यक्ष अजिंक्य जितेंद्र हिंगमिरे यांच्या युवक आघाडीतर्फे सामाजिक क्षेत्रात जेवल्लेखनीय काम केले त्याची पुस्तिका ‘तेज बसवेश्वराचे उत्कर्ष युवाशक्तीचा’ या पुस्तकाचे प्रकाशनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या उत्साहात, समाजभावनेने आणि मानवतेच्या संदेशाने संपन्न झालेलं हे आरोग्य शिबिर म्हणजे वीरशैव लिंगायत समाजाच्या सेवाभावाची जिवंत परंपरा ठरली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.