नाशिक : प्रतिनिधी
जीवनात अनेक प्रसंग येत असतात त्या क्षणाला मदत करणार्यांविषयीची कृतज्ञेतची भावना जपणे हे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नाना खैरनार यानी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात १९५ वे पुष्प गुंफताना नाना खैरनार हे राईज ऑफ काॅमन मॅन या पुस्तकावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. मिलिंद चिंधडे होते.
नाना खैरनार म्हणाले की, लहानपण, तरूणपण या सर्वच वयोगटात मित्र, मैत्रिणी भेटत असतात. त्यांची प्रत्येक क्षणोक्षणी मदत होत असते. समाजाचेही आपण काही देणे लागतो ही भावना सर्वांनी जपली पाहिजे.
यावेळी अजित कुलकर्णी व दत्तात्रय दाणी या श्रोत्याना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.
सुहास टिपरे यानी सूत्रसंचालन केले. अरुण घोडेराव यांनी आभार मानले. यावेळेस माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, डॉ. सुरेश वाकचौरे, साहेबराव उगले, मुक्ता चिंधडे, नूतन शिरसाठ, पांडुरंग चव्हाण , सुनंदा पाटील आदी उपस्थित होते.
—