नाशिक : प्रतिनिधी
डेहराडून येथील कार्तिक सिंह हा युवक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतातील छत्रपती शिवरायांचे किल्ले सायकलवरून फिरत आहे. त्या सर्व गडकोटांची माहिती गोळा करून युवकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्याने केला आहे. याबद्दल कार्तिक सिंह याचा येथील स्वराज्य परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वराज्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे, राज्य अध्यक्ष जगदीश जाधव – पाटील, महिला प्रमुख रेखा नेहरे, स्वराज्य परिवाराचे संस्थापक सदस्य विजय मोराडे – पाटील, सचिन बच्छाव यांच्यावतीने क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
—