नाशिक : प्रतिनिधी
शब्दाई पत्रिका 20 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन अतिशय धुमधडाक्यात, अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीत माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या ठिकाणी संपन्न झाला.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी, महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक या काकासाहेब चव्हाण, संपादिका स्वाती पिंगळे या सर्वांच्या शुभहस्ते शब्दाईचे प्रकाशन होताना विशेष आनंद वाटला. वीस वर्षे सातत्याने, एका निष्ठेने शब्दाई पत्रिकेचा दिवाळी अंक मराठी वाचकांसाठी उपलब्ध होतो आणि महाराष्ट्रात या अंकाचे चांगले स्वागत होते याचाही एक मनस्वी आनंद वाटतो.
—