नाशिक : प्रतिनिधी
येथील हंस योग साधना निसर्गोपचार संस्थेतर्फे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक भानुदास एकनाथ परबत व संस्थेचे योग साधक यांच्या सहकार्यातून हे फराळ वाटप करण्यात आले.
आधारतीर्थ, त्रंबकेश्वर, त्याचबरोबर मुळेगाव येथे आदिवासी पाड्यांवर फराळ वाटप करण्यात आले. यासाठी योगाचार्य मनोहर कानडे, योगशिक्षक जयश्री पाटील, सृष्टी कानडे, रत्ना लाड, मयूर खैरे, तसेच दत्तात्रय पुंड, अभिलाष मुळे, शाम गव्हाणे, पार्थ लटके या सर्वांच्या सहकार्याने हे फराळ वाटप करण्यात आले.
—