अशोकामध्ये ‘नवरंग उत्सव’ उत्साहात साजरा

0

नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एज्युकेशन्स फाऊंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील पुणे विद्यापीठ संलग्नित, नॅक प्रमाणित महाविद्यालयामध्ये नवरंग उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
महाविद्यालयातील शिक्षकांसाठी रॅम्प वॉक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांकावर रेवती नायर, तर द्वितीय क्रमांकावर समाधान निकम यांनी स्थान पटकावले. याशिवाय शिक्षकांसाठी विविध मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सोनाली इंगळे, रेखा शेखोकार आणि कोमल कदम यांनी विजेतेपद मिळवले. कार्यक्रमाची सांगता शिक्षकांच्या गरबा नृत्याने झाली.
कार्यक्रमाचे आयोजन प्रिया सिंग आणि रेवती नायर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीबीए.- सीए. शाखा विभागप्रमुख प्रतिमा जगळे आणि बी.कॉम शाखा विभागप्रमुख डॉ. परमेश्वर बिरादर  यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. हर्षा पाटील, सर्व शाखा विभागप्रमुख आणि शिक्षक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. घोष, उपप्राचार्या डॉ. हर्षा पाटील, बीबीए. शाखा विभागप्रमुख लोकेश सुराणा, बीबीए. – सीए. शाखा विभागप्रमुख प्रतिमा जगळे, बी.एस्सी-सी.एस. शाखा विभागप्रमुख सोनाली इंगळे आणि बी.कॉम शाखा विभागप्रमुख डॉ. परमेश्वर बिरादर यांचे मार्गदर्शन लाभले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.