नाशिक : प्रतिनिधी
फार्मासिस्ट दिनानिमित्त म्हसरूळ येथील गाव व काॅलनी परिसरात उपक्रम आयोजित करण्यात आले होते. जवळपास १०० पेक्षाअधिक मेडिकल स्टोअर्सला भेट देण्यात आली व त्यांच्या चालक – मालकांना कृतज्ञता म्हणून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरही झाले.
समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी नेहमीच, अगदी कोरोनासारख्या महामारीत देखील आपला जीव धोक्यात घालून अविरत औषधे नागरिकांना उपलब्ध व्हावी म्हणून मेडिकल स्टोअर्स चालकांनी कर्तव्य बजावले. यामुळेच फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते वंदना पेलमहाले व गणेश पेलमहाले यांनी मेरी – म्हसरूळ परिसरातील मेडिकल स्टोअर्सला भेट दिली व कृतज्ञता म्हणून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे आरोग्य शिबीर
महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने घेतलेल्या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री साई मंदिर, नायरा पेट्रोलपंपाजवळ, म्हसरूळ येथे हा उपक्रम झाला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिसरातील औषध दुकाने व फार्मासिस्ट यांना भेट देत त्यांचे समाजाप्रती योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमाचे नेतृत्व प्राचार्य डॉ. अनिल जाधव यांनी केले. संचालिका डॉ. प्रियंका झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम पार पडला.
—