नाशिक : प्रतिनिधी
स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या अशोका बी. एड कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने पंचवटी परिसरातील फूल बाजार, गाडगे महाराज पूल येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. नाशिक महापालिकेतील नाशिकरोड विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या मोहिमेला एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. मोनाली काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. सरिता वर्मा, बी. एड कोर्स समन्वयक डॉ. प्रिती सोनार, सर्व प्राध्यापक व इतर सहकारी वर्ग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या योगदानाने फूल मार्केट, गाडगे महाराज पूल, गोदाघाटाची शोभा आणखी वाढली.
—