नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोड येथील क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने बुधवारी (दि. 24 सप्टेंबर) या स्पर्धा झाल्या. यामध्ये निबंध, वक्तृत्व स्पर्धा व पोस्टर्स स्पर्धा यांचा समावेश होता. यात प्रशिक्षणार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.
या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे सन्मानपत्र आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी मंचावर गटनदेशक साहेबराव हेंबाडे आणि उमेश पालवे उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये रोहन राऊळ प्रथम
वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक इलेक्ट्रिशियन सीनियरचा प्रशिक्षणार्थी रोहन राऊळ, द्वितीय विजेता अमर शिंदे (फिटर सीनियर) आणि तृतीय विजेता प्रथमेश बोराडे (इलेक्ट्रिशियन सीनियर) विजेते ठरले.
निबंध स्पर्धेमध्ये मंजिरी बच्छाव प्रथम
निबंध स्पर्धेमध्ये प्रथम विजेती मंजिरी बच्छाव (इलेक्ट्रिशन सीनियर), द्वितीय विजेती शुभांगी शिंदे (कोपा ट्रेड) आणि तृतीय विजेता राज दुसाने (फिटर ज्युनियर) ठरला.
पोस्टर स्पर्धेमध्ये चव्हाण, सोनवणे व बनाईत यांचे यश
पोस्टर स्पर्धेमध्ये श्रेयस चव्हाण (इलेक्ट्रिशियन ज्युनिअर), श्रेयस सोनवणे (इलेक्ट्रिशन ज्युनियर) आणि आदित्य बनाईत (इलेक्ट्रिशन ज्युनिअर) यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणार्थ्यांना सामायिक सन्मानपत्र देण्यात आले.
प्राचार्य काळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, प्रशिक्षणार्थ्यांनी आयटीआयच्या प्रशिक्षणाबरोबर, इतर क्षेत्रातही आपला ठसा उमटविला पाहिजे. तसेच त्यांनी विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक केले.
निदेशक संदीप काजळे यांनी सूत्रसंचालन केले. निदेशिका प्रतीक्षा बदादे यांनी आभार मानले.
यांचे सहकार्य लाभले
कार्यक्रमात निदेशक संजय पवार, दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, योगेश गांगोडे, अजय पवार, मोहन पवार, सोनाली खिलाडी, भारती नागरे आदी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
—