नाशिक : प्रतिनिधी
येथील क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या आयटीआयमध्ये युनिटी सिस्टीमचे प्रमुख रोशन चेवले यांचे आज, गुरुवार (दि.18) व्याख्यान झाले.
आयटीआयमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध सेवा रोजगार व रोजगारातील कार्यक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या संधी या विषयावर रोशन चेवले यांनी आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण घेताना निवडलेल्या व्यवसायातील बारकावे व्यवस्थितपणे आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले.
चेवले यांनी सांगितले की, तुम्ही परिपूर्ण झाला तर तुम्ही कधीही उपाशी बसणार नाही. तुम्ही स्वतःचा रोजगार निर्माण करू शकतात. यासाठी त्यांनी स्वतःचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले की, ते व्यावसायिक शिक्षण घेत असतानाच दुसऱ्याच्या हाताखाली काम करून शिकले. सर्व बारकावे त्यांनी आत्मसात केले. त्यामुळेच त्यांनी आज युनिटी सिस्टीम सारखी कंपनी स्थापन करू शकले.
निदेशक संदीप काजळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शन निदेशक आनंद जाधव यांनी आभार मानले.याप्रसंगी मंचावर आयटीआयचे गटनिदेशक साहेबराव हेंबाडे, उमेश पालवे, तसेच निदेशक दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, योगेश गांगोडे, अजय पवार, प्रतीक्षा बदादे, सोनाली खिराडी आदी कर्मचारी उपस्थित होते.
—