नाशिक : प्रतिनिधी
दहा दिवसांच्या आराधनेनंतर गणेशोत्सवाची शनिवारी (दि.६) सांगता होत आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्व. सौ. सुरेखाताई भोसले निवासी खो-खो प्रबोधिनी, नाशिक यांच्या गणेशोत्सव देखाव्याचेही कौतुक होत आहे.
दरम्यान, पंचवटीतील बाप्पाची सोन्याची जेजुरीचा देखावा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी या ठिकाणी भेट देऊन या देखाव्याचे कौतुक केले आहे. मखमलाबाद नाका येथील द्रोणगिरी रो. हौ. सोसा., मधुबन कॉलनी, अमृतगंगा गार्डन जवळ येथील श्रुती नितीन गोडसे यांनी या देखाव्यावर मेहनत घेतली आहे.
दहा दिवस मोठ्या उत्साहात सुरु असलेल्या गणेशोत्सवाची आज मिरवणुकीने सांगता होणार आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणपतींचे देखील विसर्जन केले जाणार आहे. यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता, महापालिका आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक मंडळांची विद्युत रोषणाई असून, त्यांनी रथ सजविण्यास प्रारंभ केला आहे. मिरवणूक मार्गावरील वीजतारा भूमिगत करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावर खड्ड्यांच्या डागडुजी करण्यात असून मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने जागोजागी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या वतीने विसर्जनस्थळी जीवरक्षक दल तैनात ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी मिरवणुकीला उशीर झाला होता, त्यामुळे यंदा मिरवणूक वेळेत पूर्ण होण्यासाठी पोलिस आणि महापालिकेचे प्रयत्न राहणार आहे.