नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एज्युकेशन फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज (चांदशी) येथील बी.कॉम विभाग आणि इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या सहकार्याने शार्क टॅंक या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मूलभूत स्टार्टअप व्यवसाय योजना तयार करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेबद्दल माहिती देणे हा या स्पर्धेचा हेतू होता.
स्पर्धेसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे आणि अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. महाविद्यालयातील बीबीए, बीबीए – सीए, बी.एस्सी – सीएस आणि बी. कॉम शाखेतील विद्यार्थांचा सहभाग नोंदवला. यामध्ये प्राथमिक फेरीत २६, तर अंतिम फेरीत १५ विद्यार्थांनी त्यांच्यातील असलेले नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पनाचे उपस्थितांसमोर सादरीकरण केले.
स्पर्धेमध्ये प्रणव माळी आणि ऋषिकेश खैरनार हे टी.वाय.बी.एस्सी (सीएस) च्या विद्यार्थ्यांचा संघ होमस्फीअर या कल्पनेसाठी प्रथम विजेता म्हणून घोषित करण्यात आला. साहिल साधवानी हा (एफ.वाय. बी.कॉम) चा विद्यार्थी अकाउंट्रिक्स या कल्पनेसाठी उपविजेता घोषित करण्यात आला.
स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. रश्मी बोंबले यांनी बी. कॉम शाखा विभागप्रमुख डॉ. परमेश्वर बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली काम बघितले. स्पर्धेसाठी बीबीए शाखा विभागप्रमुख लोकेश सुराणा, बीबीए – सीए शाखा विभागप्रमुख प्रतिमा जगळे, बीएस्सी – सीएस शाखा विभागप्रमुख सोनाली इंगळे आणि महाविदयालयातील इतर शिक्षक व शिक्षकेतर यांनी सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, प्राचार्य डॉ. पी. ए. घोष, उपप्राचार्या डॉ. हर्षा पाटील यांचे स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभले.
—