नाशिक : प्रतिनिधी
नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघटनेच्यावतीने पत्रकारिता, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गोदारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती वृत्तपत्र लेखक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कडलग व सरचिटणीस सुरेश बागुल यांनी दिली.
पुरस्कार कार्यक्रम रविवारी (दि. २४) दुपारी १२.३० वाजता अशोक स्तंभाजवळील रूगंठा हायस्कूल येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व स्वामी सेवक दास योगानंद माऊली उपस्थित राहणार आहेत.
‘गोदारत्न’ जीवनगौरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार चंदूलाल शहा, प्राचार्य डॉ. यशवंतराव पाटील व सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
‘गोदारत्न’ पुरस्कार डॉ. तस्मिना शेख (सामाजिक), हिरामण सोनवणे (छायाचित्रकार), राजेंद्र जडे (सामाजिक), रवींद्र मालुंजकर (शैक्षणिक), महेश पठाडे (पत्रकारिता), मनोहर गायकवाड (न्यूज चॅनल, नाशिक), भाऊराव आहेर (रिक्षाचालक), सुरेश पवार (सामाजिक), दत्तात्रेय कोठावदे (सामाजिक), कैलास सोनवणे (सामाजिक), नीलेश शेलार (सामाजिक), दीपक पाटील व सहकारी (गोदामाई प्रतिष्ठान नाशिक), प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी (शैक्षणिक) अशोक पाटणी (सामाजिक) ओंकारेश्वर गुरव, विनायकराव करोले, नागपूर (सामाजिक), राजेंद्र पहाडे (वृत्तपत्र विक्रेता), रमेश विसपुते (सामाजिक), प्रकाश थोरात (सामाजिक), अनिल दुसाने (सामाजिक), सुनील बाविस्कर (सामाजिक), संजय मंडलिक (सामाजिक), हर्षद पारोळकर (सामाजिक) व अजय बुराडे (सामाजिक) यांना जाहीर करण्यात आले आहेत.
परीक्षक म्हणून वृत्तपत्र लेखक संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघोलीकर, उपाध्यक्ष नितीन घोडके व खजिनदार भरत कुमार जैन यांनी काम पाहिले.
—