नाशिक : प्रतिनिधी
नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीतर्फे संभवामि युगे युगे या भव्य आणि भावस्पर्शी नृत्यनाट्याने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या मंचावर एकत्र येत, गीतेचा आत्मा नृत्यातून उलगडून दाखवला. आज गीता आम्ही ऐकली नाही ती अनुभवली, असे म्हणत अनेकांनी कलाकारांना भेटून सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात नाशिक रोड, गोविंद नगर आणि गंगापूर रोड या तीनही शाखांतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने झाली. काही महिन्यांपूर्वी नृत्याला सुरुवात केलेल्या या मुलांनी आपल्या पहिल्या स्टेज सादरीकरणात प्रेक्षकांची मने जिंकली.
यानंतर संभवामि युगे युगे कार्यक्रम सादर झाला. गुरू सोनाली करंदीकर यांच्या संकल्पनेतून जन्मलेले हे नृत्यनाट्य, ज्यामध्ये गीतेच्या १८ अध्यायांचे तत्वज्ञान भरतनाट्यमच्या माध्यमातून सादर करण्यात आले. नृत्यातून गीतेची कथा मांडणाऱ्या प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला आत्मसात केलं होते आणि हे प्रेक्षकांच्या भावनांना थेट भिडत होते. टाळ्यांचा कडकडाट, भरून आलेले डोळे आणि कार्यक्रम संपल्यानंतर उभं राहून दिलेली दाद, हे सगळे या सादरीकरणाच्या यशाची साक्ष होते.
प्रिया करंदीकर आणि अनुराधा मटकरी यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमात आवाज देणारे मान्यवर जयंत ठोंबरे, अनुराधा मटकरी, सदानंद जोशी आणि आरती हिरे यांचा नृत्यालीतर्फे सत्कार करण्यात आला. मुख्य पाहुणे म्हणून इस्कॉन नाशिकचे अध्यक्ष कृष्णधन दास आणि नरसिंहकृपा दास उपस्थित होते. त्यांनी नृत्यालीच्या सामाजिक, सांस्कृतिक प्रयत्नांचे कौतुक केले.
हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला होता. कारण गीतेचा सार, केवळ धार्मिक ग्रंथ न राहता जीवनासाठी एक मार्गदर्शन हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हे नृत्यालीचे उद्दिष्ट होते.
—
गीता गंगाच गायत्री गोविंदेती हृदी स्थितेl
चतुर्गकार संयुक्त पुनर्जन्म न विद्यते
हे चतुर्गकार मोक्षासाठी आवश्यक…
मानवी शरीरात पंचप्राण असतात…त्याने मानवाचं अस्तित्व असते.. तसंच
सनातन धर्माचा पंचप्राण म्हणजे गीता आहे…
धर्म रक्षति रक्षतः….या सनातन धर्म रक्षणाच
कार्य सोनालीताई त्यांच्या नृत्याली भरत नाट्यम अकॅडमीच्या माध्यमातून करता आहेत…
समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी सर्व विकार दूर सारून एकचित्त अवस्थेत यावे लागते…
ही समाधी अवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवता आली…
संभवामी युगे युगे हा अतिशय सुंदर कार्यक्रम बघण्याचा सुंदर अनुभव मिळाला… गुरु सोनाली ताईंना तसेच त्यांच्या गुणी शिष्यांना असंच उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळो हीच श्रीकृष्णा चरणी प्रार्थना….
– कृष्णधन दास प्रभू, इस्कॉन
Get real time updates directly on you device, subscribe now.
Next Post