नाशिक : प्रतिनिधी
क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कारगिल दिनानिमित्त कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर सुभेदार रमेश उगले उपस्थित होते. मंचावर निदेशक दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, महेश बोडके, अमोल नागरे, गांगोडे, गोकुळ बेदाडे, संदीप काजळे, राहुल सानप व भारती नागरे आदी उपस्थित होते.
निवृत्त मेजर सुभेदार उगले यांनी प्रशिक्षणार्थींना कारगिल युद्धातील स्वानुभव कथन केले. ते शिपाई म्हणून सैन्यात रुजू झाले व सुभेदार या शेवटच्या रँक वर पोहोचून सेवानिवृत्त झाले. अनेकदा काम करताना भयानक अनुभव आले, परंतु देशासाठी सेवा करण्याची जिद्द होती म्हणून ३० वर्ष देशाची सेवा करू शकलो. प्रशिक्षणार्थींनी प्रामाणिक राहून कष्ट करत, कोणतेही काम मनापासून करून देशासाठी काहीतरी केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
प्राचार्य नितीन काळे यांनी कारगिल दिनाविषयी माहिती सांगितली व प्रशिक्षणार्थ्यींना मनात देशभक्ती रुजवण्यास सांगितले. निदेशका प्रतीक्षा बदादे यांनी कारगिल युद्धातील हुतात्म्यांची आठवण करून दिली. मातृभूमीविषयी प्रेम असेल तर आपण देशासाठी बरेच काही करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. निदेशक आनंद जाधव यांनी पाहुण्यांचा करून दिला. निदेशक संजय पवार यांनी सूत्रसंचालन केले. गटनदेशक साहेबराव हेंबाडे यांनी आभार मानले.
—
क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कारगिल दिनानिमित्त कार्यक्रम
Get real time updates directly on you device, subscribe now.