नाशिक : प्रतिनिधी
श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या महाराष्ट्र शाखेद्वारे म्हसरुळ येथे असलेले दिगंबर जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र गजपंथा (चामरलेणी) यास जिर्णोध्दारासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही तीर्थक्षेत्र कमिटी 125 वर्ष जुनी संस्था असून भारतातील समस्त दिगंबर जैन तीर्थक्षेत्राचे संरक्षण, संवर्धन यासाठी कार्यरत आहे.
या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची शिकोहपूर (हरियाणा) मध्ये बैठक झाली. तेव्हा जिर्णोध्दार कमिटीचे अध्यक्ष अनिल जमगे (सोलापूर) यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रातील सात तीर्थक्षेत्राना विकासासाठी अनुदान प्राप्त झाले आहे. त्यात नाशिक जिल्हयातील गजपंथा, कौळाणा, तसेच भामेर (धुळे जिल्हा), जटवाडा, कोठाळा (जालना), लक्ष्मीसेन मठ (कोल्हापूर), आर्यनंदी नगर ढोरकिन आदी तीर्थक्षेत्रांना अनुदानाचे चेक देण्यात आले.
महाराष्ट्र् प्रांत अध्यक्ष मिहीर गांधी यांच्या हस्ते पाच लाख रुपयांच्या निधीचा धनादेश गजपंथाचे अध्यक्ष सुमेर काले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी येथील संस्थेचे सचिव सुनील कासलीवाल, कोषाध्यक्ष सुभाष जैन, सदस्य – डॉ. विरेंद्र जैन, मंजुषा पहाडे आदी उपस्थित होते. तीर्थक्षेत्र कमिटीतर्फे डॉ. श्रेणीक शहा, मयूर गांधी, योगेश गांधी, यश शहा, महावीर शहा, सम्मेद शहा, पारस लोहाडे, मनोज पाटणी, अनिल गंगवाल उपस्थित होते.
—