नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ – मखमलाबाद लिंकरोडवरील सोहम मिसळसमोरील श्री गुरुस्थान साईबाबा मंदिर येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूवारी (दि.१०) विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ब्रह्ममुहूर्तवर श्री दत्तात्रय प्रभुच्या सगुण पाद्य पूजा, श्रीफळ आहुती होम व अभिषेक सोहळा संपन्न होत आहे.
भाविकांनी श्री दत्तात्रय प्रभुच्या सगुण पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच सायंकाळी सात वाजता बारा जोतिर्लिंग दुग्ध अभिषेक आरती व प्रसाद वाटप असेल. ही माहिती
वंदना पेलमहाले व गणेश पेलमहाले यांनी दिली.
—