रोटरी नाशिक मिडटाउनचा पदग्रहण साेहळा उत्साहात

अध्यक्षपदी जे. जे. पवार; सचिवपदी संपत काबरा, पंकज बोबडे

0

नाशिक  : प्रतिनिधी
रोटरी नाशिक मिडटाऊनचा २०२५-२६ या वर्षासाठी पदग्रहण साेहळा नुकताच झाला. अध्यक्षपदी जे. जे. पवार, सचिव म्हणून संपत काबरा व पंकज बोबडे यांनी शपथ घेतली. याप्रसंगी उद्योजक अशोक कटारिया, प्रांतपाल नाना शेवाळे, सहायक प्रांतपाल संतोष भट, अध्यक्ष ॲड. अजय जाधव, सचिव डॉ. किरण बिरारी, शिरीष वाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
डॉ. बिरारी यांनी वर्षभरात केलेल्या कामांची माहिती दिली. ॲड. जाधव यांनी वर्षभर विविध प्रकल्पासाठी सर्व प्रकारची मदत करणाऱ्या मान्यवरांप्रती ऋण व्यक्त केले. नूतन अध्यक्ष पवार यांनी मनोगतात वर्षभरात नियोजीत प्रकल्पाबाबत माहिती दिली. यात चेक डॅम, गाळयुक्त तलावातून गाळ काढणे, आरोग्य तपासणी व उपचार, गरजू विद्यार्थांना मदत, ग्लोबल ग्रांट अंतर्गत लोकांसाठी उपयुक्त प्रकल्प, वृक्ष लागवड व संवर्धन, आदिवासी भागातील लोकांसाठी कल्याणकारी योजना अशी अनेक कामे करावयाचा निर्धार व्यक्त केला.
शेवाळे यांनी रोटरी मिडटाउनच्या टीमकडून लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन जनकल्यानाची भरीव कामे करून आपल्याला विश्वास संपादन करावा असे आवाहन केले. कटारिया यांनी रोटरीच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमास माजी प्रांतपाल दादा देशमुख, राजेंद्र भामरे, माजी अध्यक्ष अवतारसिंग पनफेर, डॉ. नितीन गडकरी, डॉ. अमित धांडे, डी. आर. पाटील, चेतन भगत, डॉ. नामपूरकर, शिरीष भालेराव, दीपक ढोलकिया, प्रतिभा चौधरी, निशांत भावसार, नियोमन पटेल, दिलीप चव्हाण, नलिन राजपूत, जी. एम. जाधव, रेखा पहाडी आदी उपस्थित हाेते. दिलीप काळे व मनोज काबरा यांनी सूत्रसंचालन केले.
यावर्षी नव्याने सदस्य झालेल्या महिला रोटेरियन प्रियंका काळे, स्मिता जाधव, चारुशीला  धोळकिया, यांना अनुपमा शेवाळे यांच्या हस्ते रोटरी पिन लाऊन सदस्य करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.