फिट वाइज फिटनेस स्टुडिओमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
नाशिक  : प्रतिनिधी
दिंडोरीरोड परिसरातील रिलायन्स पेट्रोलपंपा शेजारील मधूर स्वीटच्या वर असलेले फिट वाइज फिटनेस स्टुडिओमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला.
गेल्या कित्येक वर्षांपासून फिटनेस क्लब  क्षेत्रामधील नावाजलेले नाव म्हणजे फिट वाइज फिटनेस स्टुडिओ आहे. संचालिका उमा किरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 21)झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त फिटनेस स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योगाचे प्रकार, तसेच कार्डिओ, झुंबा आणि वर्कआउट करण्यात आले. फिटनेस स्टुडिओमधील विद्यार्थ्यांसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, कॉलेज तरुण – तरुणी यांच्यासह आबाल वृद्धांनी देखील यात सहभाग घेतला.
संचालिका उमा किरवे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन पद्धतीने  जवळपास शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने योगासने करण्याचा आनंद घेतला. फिटनेस क्षेत्रामध्ये कमी वेळात प्रसिद्ध होऊन नावारूपास आलेले फिट वाईज फिटनेस स्टुडिओमध्ये नाशिकसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने संचालिका उमा किरवे यांचे मार्गदर्शन घेतात.
पावसाळा सुरू झालेला आहे, लवकरच फिटनेस स्टुडिओतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील घेणार असल्याचे फिटनेस स्टुडिओच्या संचालिका उमा किरवे यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.