नाशिक : प्रतिनिधी
जैन एकता मंचने उन्हाळ्यातील थकवा घालवण्यासाठी आणि धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त आनंदाचा अनुभव देण्यासाठी ड्रम सर्कल उपक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात सर्वांना रंग लावून आनंददायी वातावरणात झाली.
सर्वप्रथम कोर मेंबर्स मनीषा बागरेचा आणि आरती चोरडिया यांनी नवकार मंत्र म्हटले. संस्थापिका मंगला घिया यांनी मनोगत व्यक्त केले, तर मंचच्या अध्यक्षा अर्चना जांगडा यांनी सेव्ह फूड, सेव्ह वॉटर या अभियानाविषयी माहिती दिली. कोर मेंबर्सनी सेव्ह वॉटरचा संदेश देणारे आकर्षक नृत्य सादर करून या मोहिमेला अधिक बळ दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये कोर मेंबर्स पौर्णिमा सराफ, सुरेखा कांकरिया, मोनिका चोरडिया, स्मिता बोरा, अल्पना लोढा आणि प्रीती भळगट यांनी विशेष मेहनत घेतली. शर्मिला मुथा आणि शिल्पा चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला मंचच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
—