अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये विद्यार्थी आणि मातांसाठी झुंबा कार्यशाळेचे आयोजन केले होते. नर्सरीतील विद्यार्थी आणि त्यांच्या मातांना नृत्य, त्यांचे आरोग्य आणि विद्यार्थ्यांसोबत सहवास निर्माण होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये विद्यार्थी आणि त्यांच्या माता या दोघांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
तज्ज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली, सर्वांनी झुंबा या कार्यशाळेत स्वतःला झोकून दिले. सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले होते. या कार्यशाळेने कुटुंबांना एकत्र दर्जेदार वेळ घालवण्यासाठी आणि आयुष्यभराच्या आठवणी निर्माण करण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
—