नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये होळी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी होळीच्या उत्सवावर आधारित उपक्रम राबविण्यात आले होते. रंग खेळण्यासाठी विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते. गाणी वाजवण्यात आली आणि विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांनी खेळायला लावण्यात आले. चिमुकल्यांनी मित्र, शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी यांच्याबरोबरही रंग खेळण्याचा आनंद घेतला.
पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे होळीच्या विधी कल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करण्यात आल्या. ज्यामध्ये होळीदहन, धुलिवंदन, रंगपंचमीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. नैसर्गिक रसायन विरहित रंग वापरण्याचे महत्त्व, पाण्याची बचत, पाण्याचा अपव्यय कमी करा आणि प्राण्यांवर रंग न उधळता त्यांना मदत करा हे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितले.
—