नाशिक : प्रतिनिधी
अशोका एज्युकेशन फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील पुणे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाच्या बीबीए (सीए) आणि कॉम्प्युटर सायन्स शाखेच्यावतीने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातर्फे “टेकमाइंड” बी.एस्सी सायन्स आणि एम. एस्सी (सी.ए.) क्लबचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. टेकमाइंड क्लबतंर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध सत्रे आणि टेकफेस्ट या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन दोन दिवसांमध्ये करण्यात आले होते. स्पर्धेचा हेतू त्यांच्या प्रोग्रामिंग कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्याच्या क्षमता वाढवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता.
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी कॉग्निफ्रंटचे संस्थापक आणि सीईओ सुचित तिवारी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आर्टिफिशल इंटेलिजन्सचे विविध दृष्टिकोन, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये ज्ञानाचे प्रतिनिधित्व करण्याचे प्रकार, प्रस्तावित तर्कशास्त्र, कलम फॉर्ममध्ये रूपांतर, एकीकरण अल्गोरिदम, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड चेनिंग इत्यादींविषयी माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ब्लाइंड कोडिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी सुरेश सोनकांबळे यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले.
सत्रासाठी आणि स्पर्धांमध्ये शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात आली तर सहभागी विद्यार्थ्यांना देखील प्रमाणपत्र देण्यात आली.
यांचे सहकार्य लाभले
सत्रांचे आणि स्पर्धेंचे आयोजन महाविद्यालयातील शिक्षक दिपिता धांडे, राहुल सोनवणे, रामेश्वरी हुल्लुले आणि कोमल कदम यांनी केले. यासाठी बी.एस्सी-सी.एस. शाखा विभागप्रमुख सोनाली इंगळे, बी.बी.ए.-सी.ए. शाखा विभागप्रमुख प्रतिमा जगळे, बी.बी.ए. शाखा विभागप्रमुख लोकेश सुराणा, बी.कॉम शाखा विभागप्रमुख डॉ. परमेश्वर बिरादर आणि इतर शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
यांचे मार्गदर्शन लाभले
सत्रे आणि स्पर्धेंसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. घोष आणि उपप्राचार्या डॉ. हर्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
—